नांदेड - लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाचे काम निमयानुसार करा, अन्यथा मला दहा लाख रुपये खंडणी द्या. खंडणी दिली नाही तर मी काम होऊ देणार नाही, असे म्हणणाऱ्या एकावर इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज शिवभगत (रा. पावडेवाडी नाका, नांदेड), असे गुन्हा दाखल झालेल्या खंडणीबहाद्दराचे नावे आहे. प्रजासत्ताक पंकज समाजवादी भारत पक्षचा अध्यक्ष असून अहमदपूर येथे सुरू असलेल्या मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहाचे बांधकामावर भेट दिली. त्यानंतर हे बांधकाम नियमानुसार होत नाही, असे म्हणत कंत्राटदाराला दहा लाखांची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर मी काम होऊ देणार नाही, अशी धमकीही कंत्राटदाराला दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.