महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रित काम करा; नांदेड दौऱ्यादरम्यान कॅबिनेट मंत्र्यांचे आवाहन - कॅबिनेट मंत्री अशोक चव्‍हाण नांदेड दौरा

जिल्ह्याच्या पातळीवर सोडवण्यासारखे असलेले प्रश्न इथेच सोडवले जावेत. ज्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची व मुख्यमंत्र्यांची मान्यता आवश्यक आहे, असे प्रश्न मुंबईत मांडून ते सोडवण्यासाठीचे प्रयत्न आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

chavhan
कॅबिनेट मंत्री अशोक चव्‍हाण यांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली

By

Published : Jan 4, 2020, 11:43 PM IST

नांदेड - कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज पहिल्याच दिवशी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्वांना जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले आहे.

चव्हाण म्हणाले, "गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यातील विकास कामांना निधी देताना भाजप सरकारने मुद्दाम आखडता हात घेतला आहे. केवळ निधीअभावी जिल्ह्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रलंबित पडले आहेत. ग्रामीण भागातील रस्‍त्‍यांची चाळण झाली आहे. ही सर्व परिस्‍थिती सुधारण्याची संधी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे. तिन्‍ही पक्षांची वैचारिक बांधणी जरी वेगळी असली तरी भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्रित राहून काम करणे गरजेचे आहे"

हेही वाचा -'3 पक्षांच्या सरकारात 'हे' चालतच राहणार'

जिल्ह्याच्या पातळीवर सोडवण्यासारखे असलेले प्रश्न इथेच सोडवले जावेत. ज्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची व मुख्यमंत्र्यांची मान्यता आवश्यक आहे, असे प्रश्न मुंबईत मांडून ते सोडवण्यासाठीचे प्रयत्न आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

अशोक चव्हाण यांच्यामुळे जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्‍थान मिळाल्याची भावना यावेळी शेकापचे आमदार श्यामसुंदर यांनी व्यक्त केली आहे. तर, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्यास शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. यावेळी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे, माजी आमदार शंकर धोंडगे, पीआरपीचे बापूराव गजभारे, काँग्रेसचे आमदार माधवराव जवळगावकर, आमदार रावसाहेब अंतापूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांच्यासह घटक पक्षांचे लेकप्रतिनिधी, पदाधिकार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details