महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CCTV : नांदेड शहरात बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळी घालून हत्या; गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर अज्ञातांनी ( fire on Builder Sanjay Biyani ) गोळीबार केला. यात बियाणी व त्यांचा वाहन चालक हे गंभीररीत्या जखमी झाले होते. नांदेड येथील खासगी रुग्णालयात संजय बियाणी यांना दाखल करण्यात आले असताना उपचारा दरम्यान ( Sanjay Biyani died in Nanded ) त्यांचा मृत्यू झाला आहे.

संजय बियाणी
संजय बियाणी

By

Published : Apr 5, 2022, 3:01 PM IST

Updated : Apr 5, 2022, 6:32 PM IST

नांदेड - शहरातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळी घालून हत्या ( builder murder in Nanded ) करण्यात आली आहे. ही घटना शहरातील नाईक नगर येथील बियाणी यांच्या घरात घडली आहे. गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद ( Builder murder CCTV in Nanded ) झाला आहे.

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर अज्ञातांनी ( fire on Builder Sanjay Biyani ) गोळीबार केला. यात बियाणी व त्यांचा वाहन चालक हे गंभीररीत्या जखमी झाले होते. नांदेड येथील खासगी रुग्णालयात संजय बियाणी यांना दाखल करण्यात आले असताना उपचारा दरम्यान ( Sanjay Biyani died in Nanded ) त्यांचा मृत्यू झाला आहे.

संजय बियाणी यांची गोळी घालून हत्या

नांदेड शहरात एकच खळबळ-मोटारसायकलवरून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी दिवसाढवळ्या बांधकाम व्यावसायिकावर अंधाधुंद गोळीबार करून हत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नाईक नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे व्यासायिकामध्ये भीतीचे वातावरण आहे.

संजय बियाणी यांची गोळी घालून हत्या

खंडणीच्या वसुलीसाठी गोळीबार? -संजय बियाणी हे नांदेडमधले मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान गतवर्षी बियाणी यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्या कार्यालयात घुसून एका कुप्रसिद्ध गुंडाच्या नावाने खंडणी मागण्यात आली होती. तेव्हा मोठ्या शिताफीने बियाणी यांनी मी तो नसल्याचे सांगून मोठ्या शिताफीने हल्ला परतवून लावला होता.

काही दिवसांपूर्वीच काढला सुरक्षा रक्षक - बियाणी यांनासुरक्षा रक्षक देण्यात आला होता. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांचा सुरक्षा रक्षक काढण्यात आला. आज त्यांच्यावर घरासमोरच हल्ला झाला आहे. व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. व्यावसायिकाच्या हत्येच्या निषेधार्थ दुकाने बंद ठेवली आहेत.

हेही वाचा-'तो' देवदूतासारखा आला आणि चौघांचे प्राण वाचवले; मुख्यमंत्री गेहलोत यांनी केले अभिनंदन

हेही वाचा-Fire in Mahape MIDC : महापे एमआयडीसीमध्ये भीषण आग; इंधन गळतीमुळे आग लागल्याची शक्यता

हेही वाचा-ED Raid On Sanjay Raut: खासदार संजय राऊतांच्या संपत्तीवर ई़़डीची जप्तीची कारवाई

Last Updated : Apr 5, 2022, 6:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details