नांदेड :तेलंगणातील योजनांची भुरळ पडून सीमावर्ती भागातील देगलूर, धर्माबाद, बिलोली, माहूर या तालुक्यातील काही गावांनी तेलंगणात जाण्याची तयारी सुरू केली आहे. (Bharat Rashtra Samiti) त्या पार्श्वभूमीवर बीआरएसनेही जय्यत तयारी सुरू केली आहे. बीआरएसने पक्ष वाढीसाठी सर्वप्रथम नांदेड जिल्ह्याची निवड (BRS In Nanded Municipal Elections) केली आहे. येत्या काही दिवसात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची नांदेडात पहिली सभा होणार आहे. या सभेच्या तयारीसाठी तेलंगणा सरकारमधील रविंदरसिंघ हे नांदेडात आले होते. (Latest news from Nanded)
BRS In Nanded : नांदेड महापालिकेच्या निवडणुका बीआरएस लढविणार - भारत राष्ट्र समिती
तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीने (Bharat Rashtra Samiti) आपल्या पक्षाचा विस्तार आता इतर राज्यात करण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी चालविली आहे. त्याचे पहिले लक्ष्य हे नांदेड जिल्हा असून आगामी काळात होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका बीआरएस लढविणार (BRS In Nanded Municipal Elections) असल्याची माहिती रविंदर सिंग यांनी दिली. सिंग हे सोमवारी नांदेडात होणाऱ्या पहिल्या सभेसाठी मैदान आणि इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी आले होते. (Latest news from Nanded)
इस बार किसान की सरकार :यावेळी रविंदरसिंघ म्हणाले, आतापर्यंत भाजपला आजमावून पाहिले. एकवेळ आम्हालाही संधी द्या. इस बार किसान की सरकार हे बीआरएसचे ब्रीद आहे. कारण आजपर्यंत कोणत्याच सरकारने शेतकऱ्यांचा विचार केला नाही. तेलंगणात असलेली एकही योजना देशात कोणत्याच राज्यात नाही. नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्येही नाही. त्यामुळे सीमावर्ती भागातील ४० गावांनी आमच्याशी संपर्क साधला. परंतु ही गावे तेलंगणात जाण्याचा विषय हा केंद्राकडे आहे. परंतु त्यांना सुविधा देण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात पाऊल ठेवत आहोत.
कॉंग्रेसला देणार आव्हान :लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना वेळ असला तरी, महापालिकेच्या निवडणुकांमध्ये बीआरएस पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नांदेडात काँग्रेसची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.