महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खळबळजनक..! भावानेच केली विवाहित बहिणीची हत्या; आरोपी जेरबंद - भावानेच कापला बहिणीचा गळा

विवाहितेच्या सख्ख्या भावाने खंजराने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना नांदेडात घडली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. हत्ये मागचे गूढ मात्र अद्याप कायम आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भावानेच केली विवाहित बहिणीची हत्या
भावानेच केली विवाहित बहिणीची हत्या

By

Published : Jan 31, 2021, 8:37 AM IST

नांदेड- सख्ख्या भावानेच विवाहित बहिणीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना नांदेड शहरात समोर आली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास जवाहर नगरात ही धक्कादायक घटना घडली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी आरोपी भावास अटक करण्यात आली असून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल रामराव झुंजारे असे आरोपी भावाचे नाव आहे.

भावानेच केली विवाहित बहिणीची हत्या; आरोपी जेरबंद
पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेड-हैद्राबाद रस्त्यावर चंदासिंग कॉर्नरच्या पुढे जवाहरनगर तुप्पा ही वसाहत आहे. येथे हनुमान मंदिराजवळ राहत असलेल्या पूजा सदानंद वाघमारे (२४) या विवाहितेची शुक्रवारी दुपारच्या सुमारास धारधार हत्याराच्या सहाय्याने गळ्यावर आणि पाठीवर वार करुन हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांनी घटनेची माहिती पोलीस उपअधीक्षक सिध्देश्वर भोरे यांना दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले.मोबाईल लोकशेनवरून आरोपी ताब्यात-पोलिसांनी घटनास्थळावर माहिती गोळा करताना त्यांना या हत्येमागे मृत युवतीच्या लहान भावाचा भाऊ विठ्ठल रामराव झुंजारे याच्याबद्दल संशयास्पद माहिती मिळाली. त्याचा मोबाईल नंबर प्राप्त झाला. त्या मोबाईल नंबरला सायबर अधिकाऱ्याच्या मदतीने ट्रेस केल्यानंतर हा मोबाईल गोपाळचावडी भागात सुरू असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी त्या युवकाला गोपाळचावडी येथून ताब्यात घेत अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details