महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये दारूच्या नशेत भावानेच केली भावाची हत्या - दारूच्या नशेत भावानेच केली भावाचा हत्या

निवळा येथील अमोल नागोराव कोकाटे आणि त्याचा चुलत भाऊ गजानन कोकाटे हे दोघे नेहमी दारूच्या नशेत भांडण करायचे. सोमवारी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला, की चिडलेल्या गजाननने जवळच्या विळ्याद्वारे अमोलच्या मानेवर वार केला.

nanded
नांदेडमध्ये दारूच्या नशेत भावानेच केली भावाचा हत्या

By

Published : Dec 11, 2019, 7:20 PM IST

नांदेड -दारूच्या नशेत सख्ख्या चुलत भावाच्या मानेवर विळ्याने घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत अमोल नागोराव कोकाटे याचा जागीच मृत्यू झाला. जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील निवळा येथे ही घटना घडली. याप्रकरणी हदगाव पोलिसांनी रात्री उशिरा कोळी शिवारात आरोपी गजानन कोकाटे याला अटक केली आहे.

हेही वाचा -नांदेड: अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने केली आत्महत्या; कारण अस्पष्ट

निवळा येथील अमोल नागोराव कोकाटे आणि त्याचा चुलत भाऊ गजानन कोकाटे हे दोघे नेहमी दारूच्या नशेत भांडण करायचे. सोमवारी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, चिडलेल्या गजाननने जवळच्या विळ्याद्वारे अमोलच्या मानेवर वार केला. यात अमोल मानेच्या शिरा तुटल्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होऊन त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा -नांदेडमध्ये अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

स्थानिक ग्रामस्थांनी घटनेची माहिती हदगाव पोलीस ठाणे आणि निवळा पोलीस चौकी येथे कळवली. पोलिसांनी निवळा गावात जाऊन आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपी गाव सोडून पसार झाला होता. यानंतर कोळी येथे जाऊन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, पुढील तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details