महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवर 30 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार पूल - पैनगंगा नदी पूल बांधकाम न्यूज

नांदेड-हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी खासदार हेमंत पाटील यांच्याकडून केंद्र व राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू असतो. गेल्या अनेक वर्षापासूनची पैनगंगा नदीवर नवीन पूल बांधण्याची मागणी प्रलंबित होती. याबाबत खासदार पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची भेट घेवून सदरील पूलाच्या कामाला मंजूरी देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

MP Hemant Patil with MH CM
मुख्यमंत्र्यांना निवदेन देताना खासदार हेमंत पाटील

By

Published : Mar 6, 2021, 10:28 PM IST

नांदेड - विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांना जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाच्या कामाला लवकरच मंजूरी देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी खासदार हेमंत पाटील यांना दिले आहे. हिमायतनगर तालुक्यातील चातारी गावाजवळ 30 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येणार आहे. या पूलामुळे दोन्ही विभागातील अनेक गावांना फायदा होणार आहे. मराठवाड्यातून विदर्भात जाण्यासाठीचे 25 किमीचे अंतर या पुलामुळे कमी होणार आहे.



नांदेड-हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी खासदार हेमंत पाटील यांच्याकडून केंद्र व राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू असतो. गेल्या अनेक वर्षापासूनची पैनगंगा नदीवर नवीन पूल बांधण्याची मागणी प्रलंबित होती. याबाबत खासदार पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची भेट घेवून सदरील पूलाच्या कामाला मंजूरी देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. त्यानुसार आगामी अर्थसंकल्पात या पूलाच्या कामासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी खासदार हेमंत पाटील यांना दिले.

हेही वाचा-हिरेन मृत्यू प्रकरणी गृहमंत्री आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्यात बैठक

पैनगंगा नदीवर होणार पूल...!

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात यवतमाळ जिल्हा सीमा-दिघी-विरसणी-वाघी-जवळगांव-सोनारी फाटा-दुधड ते राज्य सीमा रस्त्यावरील चातारी गावाजवळ पैनगंगा नदीवर पोच मार्गासह हा मोठा पूल बांधण्यात येणार आहे. विरसणी ते वाघी-जवळगांव हा भाग राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 झाला आहे. तसेच सोनारी फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.761 (अ ) झाला आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला जोडण्यासाठी सदरचा पूल महत्त्वाचा ठरणार आहे.


हेही वाचा-अमरावतीत लॉकडाऊन शिथिल; सर्व दुकाने उघडली, भीती मात्र कायम

25 किलोमीटरचे अंतर होणार कमी...!

या पुलामुळे वरील दोन्ही राष्ट्रीय महामार्गदेखील जोडले जाणार आहेत. याशिवाय तेलंगणा राज्य जोडण्यासाठीसुध्दा पैनगंगा नदीवरील हा पूल उपयुक्त ठरणार आहे. हिमायतनगर व हदगांव तालुक्यातील अनेक गावांमधील लोकांना विदर्भात उमरखेड-महागांवकडे जाण्यासाठी 50 किमी अंतरावरून फेरा मारून जावे लागते. परंतु चातारी गावाजवळ होणाऱ्या या पुलामुळे विदर्भ-मराठवाड्यातील लोकांना ये-जा करण्यासाठी 25 किमी अंतर कमी होणार आहे. मराठवाड्यातील दिघी, पावनमारी, विरसणी, घारापूर, पिंपरी, कामारी, वाघी, टेंभूर्णी, जवळगांव, खडकी, हिमायतनगर अशा 25 गावांना तर विदर्भातील चातारी, बोरी, ब्राम्हणगांव, विडूळ, ढाणकी, कोपरा, देवसरी, खरजू, दिगडी, सावळेश्वर, तायलमनी या गावांना या पुलाचा दळणवळणासाठी फायदा होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details