नांदेड - जिल्ह्यातील उस्माननगर येथील मंडळ अधिकारी भगवान लक्ष्मण वाघमारे आणि एक खासगी इसम नारायण काळम यांनी तीन हजारच्या लाचेची मागणी केल्याचे लाचलूचपत विभागाल आढळून आले. त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
तीन हजाराची लाच मागणारा मंडळ अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात - नांदेड लाचलूचपत विभाग बातमी
मंडळ अधिकारी आणि खासगी कोर्ट डिक्री निकाला नुसार फेरफार नोंदणी करम्यासाठी लाच मागताना. लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडला. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![तीन हजाराची लाच मागणारा मंडळ अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4535130-563-4535130-1569301345283.jpg)
कोर्ट डिक्री निकाल लागलेली जमीन तक्रारदाराच्या नावे करून फेरफारला नाव नोंदणी करण्यासाठी मंडळ अधिकारी भगवान वाघमारे यांनी तीन हजार रूपये लाचेची मागणी केली होती. याबाबत संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर सापळा लावण्यात आला.
सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात मंडळ अधिकारी भगवान वाघमारे हे कोर्ट डिक्री निकाल लागलेली जमीन तक्रारदाराच्या नावे करून फेरफारला नाव नोंदणी करण्यासाठीतीन हजार रूपयांची लाच मागत असल्याचे आढळून आले. याचवेळी खासगी इसम आनंद काळम हा लाच देण्याघेण्याच्या व्यवहारात प्रोत्साहन देत असतांना आढळून आला. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंडळ अधिकारी भगवान लक्ष्मण वाघमारे (वय ५६ वर्ष, रा. संभाजी चौक सिडको नांदेड) व खासगी इसम आनंद नारायण काळम (वय ४८ वर्ष, रा. उस्मानगर) यांच्या विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (संशोधन २०१८) नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे, प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बी. एच. काकडे, पोलिस नाईक हनमंत बोरकर, किशन चिंतोरे, गणेश तालकोकुलवार, चौधरी, मारोती सोनटक्के, श्रीमती आशा गायकवाड यांनी यशस्वी केली