नांदेड - अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथील एक मुलगा बैलगाडीसह आसना नदी ओलांडताना एक मुलगा वाहून गेल्याची घटना गुरुवारी (दि. 23 सप्टेंबर) सायंकाळी घडली. यात बैलाचा मृतदेह व बैलगाडी सापडली असून मुलाचा शोध सुरू आहे. सुदर्शन इरबाजी झुंजारे (रा. बाळेगाव ता. नायगाव), असे बेपत्ता मुलाचे नाव आहे.
आसना नदीच्या पाण्याचा प्रवाहात वाढ होत आहे. पिंपळगाव (म.) येथील निवृत्ती बाळासाहेब देशमुख यांच्या शेतातील सालगड्याचा मुलगा सुदर्शन इरबाजी झुंजारे (रा. बळेगाव, ता. नायगाव) हा बैलगाडीसह नदी ओलांडत असताना वाहून गेल्याची घटना घडली. यावेळी शोध घेतला असता बैल मृतावस्थेत आणि गाडी पिंपळगावच्या शिवारात सापडली. मात्र, सुदर्शन हा अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.