महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बहिणीचा खून करुन पुरावे नष्ट करणाऱ्या भावाला अटक - प्रेमसंबंध

प्रियकराबरोबर पळून जाण्याच्या बेतात असेलल्या बहिणीची गळफास देऊन हत्या करुन आत्महत्येचा बनाव करणाऱ्या भावाच्या मुसक्या निजामपूर पोलिसांनी आवळल्या आहेत. साक्री तालुक्यातील हट्टीगाव येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.चे कलम 302, 2019 अन्वये गुन्हा दाख करण्यात आला आहे.

निजामपूर पोलीस ठाणे
निजामपूर पोलीस ठाणे

By

Published : Jun 16, 2022, 2:08 PM IST

धुळे- प्रियकराबरोबर पळून जाण्याच्या बेतात असेलल्या बहिणीची गळफास देऊन हत्या करुन आत्महत्येचा बनाव करणाऱ्या भावाच्या मुसक्या निजामपूर पोलिसांनी आवळल्या आहेत. साक्री तालुक्यातील हट्टीगाव येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.चे कलम 302, 2019 अन्वये गुन्हा दाख करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, हट्टीगाव येथे राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीचे धुळे तालुक्यातील नवलाणे गावातील एका तरुणासह प्रेमसंबंध होते. ते दोघेही पळून जाणार असल्याची कुणकुण मुलीच्या 24 वर्षीय भावाला लागली होती. यामुळे भावाने बहिणीच्या अंगावरील साडीची लेस फाडून झाडाला फास तयार करत गळफास दिला. त्यानंतर बहिणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे घरच्यांना व ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर मृताचा अंत्यविधी करताना अंगावरील सर्व कपडे, गळफास दिलेल्या साडीची लेस, असे सर्व पुरावे नष्ट केले. मात्र, याबाबतची माहिती मिळताच निजामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीच्या भावाला अटक केली आहे. पोलीस नाईक संदीप ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन निजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा -नांदेड - खासदार अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क

ABOUT THE AUTHOR

...view details