नांदेड - काँग्रेसचे दिवंगत नेते खासदार राजीव सातव यांच्या अस्थीचे विसर्जन नांदेडमधील गोदावरी नदीत आज करण्यात आले. राजीव साताव यांचे अस्थी कलश यात्रा दुपारी नांदेडला पोहचली. गोदावरी नदी काठावरील काळेश्वर येथे अस्थी विसर्जन करण्यात आले. यावेळी राजीव सातव यांच्या आई रजनीताई सातव, त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री विश्वजित कदम, सत्यजित तांबे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते अस्थी विसर्जनासाठी उपस्थित होते. विधिवत पूजा अर्चा केल्यानंतर गोदावरी नदीत राजीव यांच्या अस्थिचे विसर्जन करण्यात आले.
कोरोनामुळे झाले होते निधन -