नांदेड -नांदेडकडे येणाऱ्या रेल्वे मालगाडीचा एक डबा शिवणगाव रेल्वे स्टेशनजवळ रुळावरून खाली उतरल्याची घटना शुक्रवारी (दि. 24 सप्टेंबर) घडली. यामुळे काही तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यंत्रणेने हा डबा पुन्हा रेल्वे रुळावर आणून रेल्वे सेवा सुरळीत केली.
शिवणगाव रेल्वे स्टेशन सिग्नलजवळ काही तांत्रिक कारणामुळे सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नांदेडकडे येणाऱ्या एका मालगाडीचा डब रुळावरून खाली उतरल्याची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर रेल्वेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी तात्काळ शिवणगाव स्टेशन गाठून रेल्वे रूळाखाली उतरलेल्या मालगाडीचा डबा शर्थीचे प्रयत्न करून पुन्हा रेल्वे डबा रुळावर आणून रेल्वे वाहतूक सुरळीत केली.