नांदेड - जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन पिकाच्या बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झाल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील सर्वदूर भागातून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणांच्या तक्रारी येताय आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात शेतशिवारात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवत नसल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगवण क्षमता नसणाऱ्या सोयाबीन बियाणांच्या शेतात दुबार पेरणीसाठी नांगर फिरवण्यास सुरवात केली आहे.
हेही वाचा...आदिवासी विकास महामंडळाचा बेजबाबदारपणा.. गोदामांअभावी शेकडो क्विंटल धान्य पावसाने सडले
नांदेड जिल्ह्यात 21 जूनपर्यंत सरासरी 120 मिलिमीटर पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या 13 टक्के इतका हा पाऊस आहे. जिल्ह्यात सर्वत्रच हा पेरणीलायक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी विविध जातींची बियाणे विकत आणून पेरणी केली. मात्र, पेरलेले बियाणे उगवलेच नाही. तर काही ठिकाणी बियाणे अल्प क्षमतेने जमिनीवर उगल्याचे दिसत आहे. त्यामुळे दुबार पेरणीशिवाय शेतकऱ्यांना आता पर्याय राहिलेला नाही.