नांदेड - बेपत्ता महाविद्यालयीन युवतीचा घराजवळील विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना मांडवीच्या दत्तनगर भागात घडली. दोन दिवसांपूर्वी रोशनी तुळशीराम राठोड ही युवती बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह सोमवारी संशयास्पदरीत्या घराशेजारील विहिरीत तरंगताना आढळून आला.
हेही वाचा - विकृतीचा कळस! चंद्रपुरात तरुणावर 14 जणांचा अनैसर्गिक अत्याचार, तरुणाची आत्महत्या
रोशनी ही सरस महाविद्यालयात १२वीत शिकत होती. १८ जानेवारीला रोशनी नेहमीप्रमाणे महाविद्यालयातून घरी परतली. दप्तर ठेवून काही वेळातच ती घरातून निघून गेली. तेव्हापासून ती बेपत्ता होती. मुलगी घरी परत न आल्याने आई दुर्गा तुळशीराम राठोड यांनी मांडवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार ५/२० कलम ३६३ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - तरुणीचा चोरून काढलेला व्हिडिओ टिक-टॉकवर व्हायरल करणे पडले महागात
मांडवीच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार शिवप्रसाद कराळे आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी विजय कोळी, वैजनाथ मोटरगे करीत आहेत.