नांदेड- कोरोनाने देशासह राज्यात थैमान घातले आहे. कोरोनाचे संकट असताना रक्ताचा तुटवडा जाणवू नये यासाठी राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर धर्माबाद पोलीस ठाणे व शिव संघटनेतर्फे आज धर्माबाद पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
नांदेडच्या धर्माबाद पोलीस ठाण्यात रक्तदान शिबीर; शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद - nanded
रक्तदान शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. शिबिरात सुमारे २०० लोकांनी रक्तदान केले आहे.
रक्तदान करताना पोलीस अधिकारी
रक्तदान शिबिरास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. शिबिरात सुमारे २०० लोकांनी रक्तदान केले आहे. शिबिरात धर्माबादचे तहसीलदार शिंदे, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक सोहन माछरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश देवरे, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ संनगले यांनी देखील रक्तदान केले.
हेही वाचा-ग्रामपंचायतसह अंगणवाडी कर्मचाऱ्यांना २५ लाखाच्या विम्याचे कवच; राज्यशासनाकडून मागणीची दखल..!
Last Updated : Apr 5, 2020, 8:58 PM IST