नांदेड - खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारला सुबुद्धी येण्याकरीता दाभड (ता. अर्धापूर) येथील श्री सत्यगणपती मंदिरासमोर साकडे आंदोलन करण्यात आले.
महिला अत्याचाराच्या प्रश्नावर आघाडी सरकारविरोधात भाजपाचे साकडे अंदोलन - maharashtra issues of womens
राज्यात आघाडीचे सरकार आल्यापासून कायद्याची भीती राहिली नाही. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. राज्य शासनाकडे वेळोवेळी निवेदने-तक्रारी करूनही डोळेझाक करत आहे. त्यांना सुबुद्धी फक्त आता देवच देऊ शकतो. त्यामुळे आघाडी सरकारला सुबुद्धी यावी, यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने श्री सत्य गणपती मंदिरासमोर साकडे आंदोलन करण्यात आले.

निवेदने-तक्रारी करूनही डोळेझाक
राज्यात आघाडीचे सरकार आल्यापासून कायद्याची भीती राहिली नाही. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. राज्य शासनाकडे वेळोवेळी निवेदने-तक्रारी करूनही डोळेझाक करत आहे. त्यांना सुबुद्धी फक्त आता देवच देऊ शकतो. त्यामुळे आघाडी सरकारला सुबुद्धी यावी, यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने श्री सत्य गणपती मंदिरासमोर साकडे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर, महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, महिला मोर्चा प्रदेश कार्यकरणी सदस्य शितल भालके, सरचिटणीस व्यंकटराव मोकले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख, अॅड. दिलीप ठाकूर, व्यंकटेश जिंदम आदी उपस्थित होते.