दूषित पाणीपूरवठा: मुदखेड नगरपालिके समोर भाजपचे आंदोलन... - मुदखेड नगरपालिका बातमी
मुदखेड शहर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मुदखेड नगरपालिकेवर गेल्या दोन दशकापासून काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. मुदखेड शहरांमध्ये विविध योजनांअंतर्गत अनेक ठिकाणी जलकुंभाची उभारणी करण्यात आली.
मुदखेड नगरपालिके समोर भाजपचे आंदोलन...
नांदेड - जिल्ह्यातील मुदखेड शहरात मागील काही दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा होत आहे. यामुळे मुदखेड शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुदखेड शहर नगरपालिकेच्या या दुषित पाणी पुरवठ्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुदखेड नगरपालिके समोर घोषणाबाजी करुन आंदोलन करण्यात आले. सत्ताधारी काँग्रेस सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करत मुदखेड नगरपालिका बरखास्त करवी, अशी मागणी भाजपचे प्रविण गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.