महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय राऊत, नवाब मलिकांना शाहरुख खानने भाड्याने घेतले - नितेश राणे - महाविकास आघाडी न्यूज

संजय राऊत कुठल्या लेवलचा गांजा ओढतात हे त्यांना विचारा, कारण तो माणूस शुद्धीत बोलत नाही, हे समजले आहे, असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. एनसीबी पकडलेला गांजा भाजपाकडे देते आणि त्या नशेत भाजपा उलटसुलट वक्तव्य करत असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. नितेश राणे यांनी देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणूक प्रचारादरम्यान राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

नितेश राणे
नितेश राणे

By

Published : Oct 24, 2021, 1:17 PM IST

Updated : Oct 24, 2021, 1:24 PM IST

नांदेड -शाहरुख खानकडे इतका पैसा झाला आहे, की त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना भाड्याने घेतले आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे नेते गांजा आणि आर्यन खानविषयी सातत्याने वक्तव्य करत असल्याचे नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले. देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान राणे देगलूर येथे भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा -आधी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - नितेश राणे

'संजय राऊत कोणत्या लेवलचा गांजा घेतात?'

संजय राऊत कुठल्या लेवलचा गांजा ओढतात हे त्यांना विचारा, कारण तो माणूस शुद्धीत बोलत नाही, हे समजले आहे, असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. एनसीबी पकडलेला गांजा भाजपाकडे देते आणि त्या नशेत भाजपा उलटसुलट वक्तव्य करत असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. नितेश राणे यांनी देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणूक प्रचारादरम्यान राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

हेही वाचा -बांगलादेशातच नाही, तर मुंबईतही हिंदू असुरक्षित - नितेश राणे

'महाराष्ट्रात इतर विषय संपले का?'

महाविकास आघाडी सातत्यानं गांज्या आणि ड्रग्जबद्दल बोलत आहेत. महाराष्ट्रात रोजगार, शेतकरी आणि इतर प्रश्न देखील आहेत. त्यावर सरकार बोलायला तयार नाही. मग हे प्रश्न संपले आहेत का, असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला. देगलूर-बिलोली मतदार संघातून भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

Last Updated : Oct 24, 2021, 1:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details