नांदेड - शासनाने शेतकर्यांना ओल्या दुष्काळाचे हेक्टरी ८ हजार मदत जाहीर केलेली आहे. परंतु अद्यापही ही अनेक शेतकर्यांपर्यंत पोहचली नाही. बर्याच प्रमाणात अद्यापही शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत, त्यामुळे शासनाने ओल्या दुष्काळाचे अनुदान नांदेड जिल्ह्यातील उर्वरीत शेतकर्यांना तात्काळ देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवी पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'देशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता समुपदेशन करण्याची गरज'
मागील चार ते पाच वर्षांपासून कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ असल्यामुळे राज्यातील शेतकर्यांसह नांदेडमधील शेतकरी आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहेत. नांदेड जिल्ह्यात ओल्या दुष्काळामुळे खरीपाची पिके हातातून गेली. त्यामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी व इतर पिकांचे ओल्या दुष्काळाने मोठे नुकसान झालेले आहे. राज्याचे महामहीम राज्यपाल यांनी बादीत शेतकर्यांना ८ हजार रूपये हेक्टरी मदत तात्काळ जाहीर केली. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील काही शेतकर्यांना अनुदान मिळाले आहे, परंतु अद्यापही ७० टक्के शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. राज्य सरकार व प्रशासनाच्या दुलर्र्क्ष कारभारामुळे सदर अनुदानापासून शेतकरी वंचित आहे. दहा दिवसांच्या आता उर्वरित शेतकर्यांना ओल्या दुष्काळाचे अनुदान त्वरीत देण्यात यावे अन्यथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रभारी संजय कौडगे, भारतीय जनता युवा मोर्चाचे नांदेड जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रवि पाटील खतगावकर, सरचिटणीस अरूण सुकळकर, अॅड. रावसाहेब देशमुख, उपाध्यक्ष नागनाथ पाटील, संदीप पावडे, माधवसिंह ठाकूर, अमोल कपाटे, लोहा तालुकाध्यक्ष सुरेश मोरे आदी जणांची उपस्थिती होती.
हेही वाचा -'असे' आहे साईबाबांचे पाथरीतील जन्मस्थळ; जातं, उखळ अन् बरंच काही...