महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. तुषार राठोडांना विधानसभेची उमेदवारी देऊ नये; भाजप कार्यकर्त्यांची चिखलीकरांना विनंती - मुखेड कृषी उत्पन्न बाजार समिती

मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. तुषार राठोड हे पक्ष कार्यकर्त्यांच्या जागेवर राठोड मित्र मंडळाच्या लोकांना प्राधान्य देतात, यामुळे त्यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नये, अशी विनंती भाजप कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळानी खासदार चिखलीकरांकडे केली आहे.

मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचे भाजप शिष्टमंडळ

By

Published : Sep 5, 2019, 2:12 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. तुषार राठोड हे आहेत. दरम्यान, मागील पाच वर्षापासून त्यांनी भाजपाचे संघटन न वाढवता राठोड मित्र मंडळ बळकट करण्यावर भर दिला. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांच्या शिष्टमंडळाने खासदार चिखलीकरांकडे केली.

हेही वाचा -आमच ठरलंय... शिवसेना- भाजपचा प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री - रामदास कदम

या निवेदनात संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व परिवारातील इतर शाखेमधे काम करणा­ऱ्या कार्यकर्त्यांना सतत अपमानास्पद वागणूक देण्यात येते. मुखेड शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या एकाही कार्यकर्त्याला संधी न देता सर्व जागेवर राठोड मित्र मंडळाच्याच लोकांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भाजपची सत्ता असूनही आमदारांच्या अशा मनमानी कारभाराने नगरपालिकेची जागा काँग्रेसने जिंकली. तसेच, मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकिय मंडळाची नियुक्ती करण्याचे आदेश सरकारने दिले होते. मात्र, यातील सर्व 17 सदस्य व एक चेअरमन अशा एकूण 18 पदांवर एकाही भाजपच कार्यकर्त्याचा समावेश करण्यात आला नाही, तर राठोड मित्र मंडळाच्याच लोकांना स्थान देण्यात आले. अशा अनेक बाबी चिखलीकरांच्या निर्दशनास आणून देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - ऐन गणेशोत्सवातच राज्यातील शेतकरी, कामगार, शिक्षक रस्त्यावर.. फडणवीस सरकारची कसोटी

यासोबतच मतदार संघातील जवळपास 80 ते 90 गावातील रिक्त असलेल्या सेवा सहकारी पतसंस्थेवर प्रशासकीय नियुक्ती करण्याचे पत्र सरकारकडून मिळाले होते. यामधील 90 टक्के जागांवर राठोड मित्र मंडळाच्याच लोकांना संधी देण्यात आली, व अनेक वर्षांपासून काम करणारे भाजप कार्यकर्ते वंचित राहिले. तसेच, श्रध्देय अटलजींच्या नांदेड येथील गोदावरी नदीत अस्थिविसर्जनाच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व भाजप व परिवाराचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, मुखेड - कंधार मतदार संघाचे आमदार महोदय नांदेडमध्ये हजर असून देखील त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असे अनेक खुलासे या निवेदनात करण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details