नांदेड- महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे महापालिका सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष प्रविण साले यांनी केला आहे.
नांदेड महापालिका सुडाचे राजकारण करतेय - प्रविण साले - फडणवीस नांदेड दौरा
भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवारी नांदेडला येत आहेत. त्या निमित्ताने भाजपने शहरात बॅनर आणि कमानी लावण्याची परवानगी मागितली होती. मात्र, मनपाने ही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी मनपाचा निषेध केला.
प्रविण साले
भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवारी नांदेडला येत आहेत. त्या निमित्ताने भाजपने शहरात बॅनर आणि कमानी लावण्याची परवानगी मागितली होती. मात्र, मनपाने ही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी मनपाचा निषेध केला. दरम्यान, मनपाने ही परवानगी का नाकारली? याचा खुलासा केला नाही. त्यामुळे नांदेडमध्ये सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप प्रविण साले यांनी केला आहे.
Last Updated : Jan 24, 2020, 4:31 PM IST