महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'या' मतदारसंघात आहेत राज्यातील सर्वाधिक उमेदवार रिंगणात

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघ हा एका वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरला आहे. कारण या मतदारसंघात राज्यातील सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे तब्बल 148 उमेदवार रिंगणात आहे.

भोकर मतदारसंघ

By

Published : Oct 5, 2019, 12:26 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. भोकर मतदारसंघात राज्यातील सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे हा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे. शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल १४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. राज्यातील हा सर्वात मोठा आकडा असल्याची माहिती आहे. जर सर्वच उमेदवार शेवटपर्यंत कायम राहिले तर मतदानासाठी नऊ वोटिंग मशीन लावाव्या लागणार आहेत.

भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महायुतीचे बापूसाहेब गोरठेकर यांच्यात मुख्य लढत आहे. तसेच इतर इच्छुक उमेदवारांची संख्याही वाढली आहे. त्यातील अनेकजण अपक्ष उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी आईलवार यांना उमेदवारी दिली आहे. भोकरव्यतिरीक्त बाहेरचे उमेदवारही जास्त आहेत. काहींचे रुसवे-फुगवे दूर करणे तर काहींची किंमत करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे काम प्रमुख उमेदवारांना करावे लागणार आहे. पण परिस्थिती बदलली नाहीतर एका व्होटिंग मशीनवर १६ असा आकडा गृहीत धरले तर ९ मशीन लागतील. अनेकजण उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतील अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. एकंदरीत राज्यात सर्वाधिक उमेदवारी अर्ज भरण्याची संख्या ही नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात आहे. त्यामुळे हा मतदारसंघ चर्चेचा विषय आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details