नांदेड - माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आज काँगेसमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपा सोडून काँगेसमध्ये जातानासुद्धा त्यांनी भाजपा नेत्यांचे कौतुक केले. पक्ष सोडताना सहसा नेते हे पक्ष आणि नेत्यांवर टीका करतात. पण खतगावकर यांनी मात्र पक्ष आणि नेत्यांचे कौतुक केले. भाजपात देखील मला मानसन्मान मिळाला. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांनी मला चांगली वागणूक दिली. आता अशोक चव्हाण यांना बळ देण्यासाठी आपण घरवापसी करत असल्याचे ते म्हणाले. आज देगलूर मतदान संघात झालेल्या जाहीर सभेत त्यांनी काँगेसमध्ये प्रवेश केला. काँगेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांची यावेळी उपस्थिती होती.
काँग्रेस प्रवेशानंतर भास्करराव खतगावकर म्हणाले, फडणवीस, दानवे यांनी... - नांदेड काँग्रेस लेटेस्ट न्यूज
भाजपात देखील मला मानसन्मान मिळाला. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांनी मला चांगली वागणूक दिली. आता अशोक चव्हाण यांना बळ देण्यासाठी आपण घरवापसी करत असल्याचे ते म्हणाले. आज देगलूर मतदान संघात झालेल्या जाहीर सभेत त्यांनी काँगेसमध्ये प्रवेश केला.
'अशोक चव्हाण यांना राष्ट्रीय राजकारणात येऊ द्या'
अशोक चव्हाण यांना आता राष्ट्रीय राजकारणात येऊ द्या. त्यांची तिथे गरज असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केले. देगलूर पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. त्यापूर्वी काही नेत्यांनी अशोक चव्हाण मराठवाड्याचे प्रभावी नेते असल्याचा उल्लेख केला होता. त्यावरून पाटील यांनी हे वक्तव्य केले. अशोक चव्हाण यांना मराठवाड्यापुरता मर्यादित ठेऊ नका. आम्हाला अशोक चव्हाण यांना राष्ट्रीय नेता म्हणून बघायचे आहे, असे पाटील म्हणाले.