नांदेड : हैद्राबाद स्थित एमआयएम या राजकीय पक्षानंतर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा भारत राष्ट्र समिती हा राजकीय पक्ष नांदेडमध्ये प्रवेश करू पाहत आहे. त्यासाठी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री पुढच्या आठवड्यात नांदेड दौऱ्यावर ( First public meeting of BRS party in Nanded ) येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील तेलंगणा सीमेवरच्या तेलगू भाषिक लोकांना आकर्षित करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येणार असल्याची चर्चा आहे. ( BRS party in Nanded ) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत भारत राष्ट्र समिती पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा मानस तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या नांदेड दौऱ्यावरून वादंग होण्याची चिन्हे आहेत.
तेलंगणा राष्ट्र समिती पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून पक्ष वाढ कारण्यासठी सज्ज :BRS पक्षाचे राष्ट्रीय पक्ष म्हणून विस्तारीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री केसीआर यांनी कंबर कसली असून या अगोदर कर्नाटक राज्यात बैठका आणि सभांचे सत्र सुरू केले. तर तेलंगणा राष्ट्र समिती अथवा बीआरएस ( BRS ) पार्टी महाराष्ट्रात आपल्या पक्षाची वाटचाल सुरू करण्यासाठी पहिली जाहीर सभा नांदेड येथे घेणार आहे. दरम्यान यासाठी बीआरएस ( BRS ) पक्षा कडून आज सभेचे स्थान निश्चित करण्यासाठी स्थळ पाहणी करण्यात आली. या महिन्याच्या सात तारखेनंतर पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर राव हे नांदेड येथील पवित्र श्री हुजूर साहब सचखंड गुरुद्वाऱ्याचे दर्शन घेतील, यानंतर बीआरएस ( BRS ) पक्षाच्या महाराष्ट्रातील वाटचालीची सुरुवात करतील. (Telangana Rashtra Samithi )