महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड : निवडणुकीच्या धामधुमीत सट्टा बाजारातही तेजी

विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच आहे. निवडणुकीच्या धामधुमीत सट्टा बाजारातही तेजी आली आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाण, श्यामसुंदर शिंदे, राजेश पवार, दिलीप कंदकुर्ते, बालाजी कल्याणकर, तुषार राठोड ,भीमराव केराम या उमेदवारांच्या नावाभोवती सट्टा बाजार गरम असल्याचे चित्र आहे.

By

Published : Oct 23, 2019, 11:46 AM IST

नांदेडमध्ये उमेदवारांच्या नावावर सट्टा

नांदेड - जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात कोण निवडून येणार याची सर्वांना उत्सकुता आहे. निवडणुकीच्या धामधुमीत सट्टा बाजारातही तेजी आली आहे. अशोक चव्हाण, श्यामसुंदर शिंदे, राजेश पवार, दिलीप कंदकुर्ते, बालाजी कल्याणकर, तुषार राठोड ,भीमराव केराम या उमेदवारांच्या नावाभोवती सट्टा बाजार गरम असल्याचे चित्र आहे.


नांदेड जिल्ह्यात 2014 साली काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी चार जागी विजयी झाली होती. तर मुखेडमध्ये निवडणूक आणि पोट निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागला होता. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा 2014 च्या निवडणुकीत प्रभाव दिसला होता. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्थानिक समीकरणे जास्त प्रभावशाली ठरली. सोमवारी विधानसभेसाठी जिल्ह्यात सर्वत्र मतदान झाले.

हेही वाचा - 2014 ला राज्यात होती 'अशी' स्थिती; यंदाही आघाडीला धक्का देत युती सुसाट?


हदगाव आणि देगलूर मतदारसंघामध्ये कुणाचा विजय होईल, याबाबत गोंधळ आहे. हदगावमध्ये नागेश पाटील आष्टीकर, बाबुराव कदम आणि माधवराव जवळगावकर यांच्यात तिरंगी लढत आहे. या तिघांपैकी एका नावावर सट्टेबाजांची पसंती होत नसल्याचे चित्र आहे. मात्र, पसंतीक्रमात आष्टीकरानंतर बाबुराव कदम यांचा क्रमांक लागला आहे. देगलूरमध्ये सुभाष साबणे यांच्या खालोखाल रावसाहेब अंतापूरकर यांना पसंती मिळत आहे.

हेही वाचा - पश्चिम महाराष्ट्र विभाग - कोण मारणार 'बाजी'?


सट्टा बाजारातील अंदाज हे सहसा खोटे ठरत नसतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील नऊ जागांचा कौल कुणाकडे आहे, याचा अंदाज येऊ शकतो. दरम्यान, नांदेड शहरातील विधानसभेच्या दोन्ही जागांवर सट्टा जास्तच जोरात आहे. दक्षिणमध्ये चावी, धनुष्यबाण, पंजा असा पसंतीक्रम आहे. तर उत्तरमध्ये धनुष्यबाण आणि पंजा या दोघांमध्ये चुरस आहे. भोकरमध्ये मात्र सर्वाधिक पसंती चव्हाण यांना मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details