नांदेड- किनवट येथे कापसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या अस्वलाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला चिखली येथील शेतकरी शेख जावेद याची प्रकृती गंभीरच आहे. त्याला उपचारासाठी नागपूरला हलविल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी किसन खंदारे यांनी दिली.
नांदेड: अस्वल हल्ल्यातील शेतकऱ्याची प्रकृती गंभीरच - nanded farmer
कापसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या अस्वलाने केलेल्या हल्ल्यात चिखली येथील शेतकरी शेख जावेद हा गंभीर जखमी झाला होता. जखमा अधिक गंभीर असल्याने जावेद याला शुक्रवारी आदिलाबाद येथून नागपूरला हलवण्यात आले. त्याचा एक डोळा निकामी होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली.
जावेद याच्यावर गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्याला तातडीने तेलंगणाच्या आदिलाबाद येथे हलविण्यात आले होते. जखमा अधिक गंभीर असल्याने जावेद याला शुक्रवारी आदिलाबाद येथून नागपूरला हलवण्यात आले. त्याचा एक डोळा निकामी होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली.
वनविभागाच्यावतीने जखमी जावेदच्या उपचारासाठी आधी ५ हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली होती. शुक्रवारी पुन्हा २० हजारांची मदत देण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी किसन खंदारे यांनी दिली.