महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बंगळुरू उत्सव विशेष रेल्वेस एक फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; २५ डिसेंबरपासून केलाय बदल - banglore festive special train news

दक्षिण मध्य रेल्वेने बंगळुरू उत्सव विशेष रेल्वेला एक फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत वाढ दिली आहे. रेल्वे संख्या 06519 व 06520 नांदेड-बंगळुरू-नांदेड उत्सव विशेष या रेल्वेच्या वेळेत २५ डिसेंबरपासून बदल करण्यात आला आहे.

south central railway news
बंगळुरू उत्सव विशेष रेल्वे

By

Published : Dec 23, 2020, 3:30 PM IST

नांदेड-दक्षिण मध्य रेल्वेने बंगळुरू उत्सव विशेष रेल्वेला एक फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत वाढ दिली आहे. रेल्वे संख्या 06519 व 06520 नांदेड-बंगळुरू-नांदेड उत्सव विशेष या रेल्वेच्या वेळेत २५ डिसेंबरपासून बदल करण्यात आला आहे. तसेच गाडीचा यशवंतपूर येथील थांबा २५ डिसेंबरपासून रद्द करण्यात आला आहे याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे, आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
असा आहे बदल
ही रेल्वे २५ डिसेंबरपासून बंगळुरू ते हुजूर साहिब बंगळूर रेल्वे स्थानकावरून रात्री २२.५० वाजता सुटेल.

पुढील स्थानकांसाठीच्या वेळा-

धर्मावरम - 03.45

गुंटकळ 06.00

रायचूर 08.05

विकाराबाद 13.00

परळी - 18.40

परभणी - 20.30

नांदेड - 22.50

हुजूर साहिब नांदेड ते बंगळुरू (06520) उत्सव विशेष रेल्वे 25 डिसेंबरपासून हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सकाळी 6.30 वाजता सुटेल. पूर्णा-7.05, परभणी-7.40, गंगाखेड-8.10, परळी-9.20, विकाराबाद-दुपारी 2.00, रारचूर सायंकाळी 7.12, गुंटकळ रात्री 9.15, धर्मावरम-00.30 मार्गे बंगळूर येथे सकाळी 4.50 वाजता पोहोचेल असे, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड रेल्वे विभागातील जनसंपर्क कार्यालयाने कळवले आहे.

हेही वाचा -शीना बोरा हत्या प्रकरण : इंद्राणी मुखर्जीचा तुरुंगात दोषीचा गणवेश घालण्यास नकार

ABOUT THE AUTHOR

...view details