नांदेड - नांदेड-लातूर या राष्ट्रीय महामार्गाची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून जाताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तीर्थक्षेत्र माळेगावची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येत असतात. यामुळे खंडोबारायांच्या दर्शनासाठी माळेगावकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढते. मात्र, बांधकाम विभागाने अद्याप खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले नाही. त्यामुळे माळेगाव यात्रेपूर्वी खड्डे बुजवा अन्यथा आंदोलनक करणार असल्याचा गावकऱ्यांनी इशारा दिला आहे.
नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था हेही वाचा - मी माझ्या वक्तव्यावर ठाम, माफी मागणार नाही - राहुल गांधी
राष्ट्रीय महामार्ग 361 च्या चौपदरीकरणासाठी केंद्र शासनाने मोठा निधी दिला आहे. या कामाची निविदा निघून २ वर्ष उलटले. मात्र, या महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. चौपदरीकरणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोदकाम करण्यात आले आहे, तर रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातात अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे, अशी माहिती नागरिकांनी दिली आहे. अपघात रोखण्यासाठी यात्रेच्या अगोदर खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा - संतापजनक..! पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; खून करून सावत्र बाप फरार