महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हदगाव विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेतील बंडखोरीमुळे काँग्रेसच्या गोटात आनंद - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

हदगावमध्ये शिवसेनेचे 40 वर्षांपासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या बाबुराव कदम यांनी बंड पुकारला आहे. खर्च करण्याची ऐपत नसल्यामुळे शिवसेनेने कदम यांना उमेदवारी नाकारली, पक्षाने हदगावात विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची उमेदवारी कायम ठेवली आहे.

शिवसेनेतील बंडखोरीमुळे काँग्रेसच्या गोटात आनंद

By

Published : Oct 6, 2019, 5:15 PM IST

Updated : Oct 6, 2019, 5:31 PM IST

नांदेड- जिल्ह्यातील हदगावमध्ये सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस-शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन केले. मात्र, हदगावात सध्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराचीच चर्चा होत आहे. सेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने हदगावात मोठी चुरस निर्माण झाली आहे.

शिवसेनेतील बंडखोरीमुळे काँग्रेसच्या गोटात आनंद

हदगावमध्ये शिवसेनेचे 40 वर्षांपासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या बाबुराव कदम यांनी बंड पुकारला आहे. खर्च करण्याची ऐपत नसल्यामुळे शिवसेनेने कदम यांना उमेदवारी नाकारली, पक्षाने हदगावात विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. या प्रकारामुळे सेनेचा एक मोठा गट येथे अस्वस्थ झाला आहे.

हेही वाचा - पत्नीच्या आमदारकीसाठी हिंगोलीचे 'खासदार' नांदेडमध्ये अडकले

शिवसैनिकांनी पैसे जमा करत बाबुराव कदम यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला आहे. कदम हे सच्चे शिवसैनिक म्हणून हदगाव हिमायतनगरमध्ये ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांना मोठे जनसमर्थन मिळत आहे. शिवसेनेतील बंडखोरीमुळे काँग्रेसच्या गोटात आनंदोत्सव पसरला आहे. काँग्रेसकडून माधवराव पाटील जवळगावकर मैदानात आहेत. जवळगावकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे आता काँग्रेसमध्ये आहेत, त्यामुळे आपल्याला हदगावात सहज विजय मिळेल, अशी आशा काँग्रेसला आहे.

हेही वाचा -'या' मतदारसंघात आहेत राज्यातील सर्वाधिक उमेदवार रिंगणात

सेनेचे विद्यमान आमदार नागेश पाटील आष्ठीकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर बंडखोर बाबूराव कदम यांनी पक्षातच राहावे, यासाठी आमदार पाटली आणखीही आग्रही आहेत. तर वंचित आघाडीने हदगावमधून शिवकिरण भारती यांना उमेदवारी दिली आहे. वंचित आघाडीसाठी हा मतदारसंघ सुरक्षित असा मानला जातो. त्यामुळे वंचित आघाडीला कसा प्रतिसाद मिळतो, यावर हदगावचे राजकीय गणित अवलंबून असणार आहे. तरीही हदगावात सध्या आमदार नागेश पाटील विरोधात सारेच पक्ष एक झाले आहेत. त्यामुळे हदगावच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Oct 6, 2019, 5:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details