नांदेड- सर्वत्र स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाची तयारी सुरू असताना हदगावात रात्रीच्या वेळी क्षुल्लक कारणावरून दोघांवर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये एकजण गंभीर जखमी असून, दोघांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोघांवर खंजीरने हल्ला, एकजण गंभीर
हदगावात रात्रीच्या वेळी क्षुल्लक कारणावरून दोघांवर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये एकजण गंभीर जखमी असून, दोघांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
तक्रारदार शिव पोगरे हा गजानन पोलकरसोबत दुचाकीवरून हदराव शहरातून मुल्ला गल्लीतील मित्राकडे जात होता. यावेळी शेख नजीर व शेख अजहर यांना दुचाकीचा धक्का लागल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. या शाब्दिक वादाचे रूपांतर भांडणात झाल्यावर अजहर व नजीर या दोघांनी खंजीर काढून त्या दोघांवर हल्ला केला. यामध्ये शिव व गजानन हे दोघे जखमी झाले असून त्यांना हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी दोघांनाही नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शिव पोगरे याच्या तक्रारीवरून शेख अजहर, शेख नजीर यांच्याविरुद्ध हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.