नांदेड - मागास वस्तीच्या सीसी रोड दुरुस्तीच्या कामाचा धनादेश देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या लोकसेवकाला एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. सहाय्यक लेखाधिकारी मधुकर बालाजी मोरे, असे या लेखाधिकाऱ्याचे नाव आहे.
सहाय्यक लेखा अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात - Nanded bribe news
बिलोली तालुक्यातील जिगळा येथील दलित वस्तीमधील सीसी ररस्ता दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. त्यानंतर या कामाचा धनादेश देण्यासाठी जिल्हा परिषदेतील लेखाधिकारी मधुकर बालाजी मोरे याने एकूण रकमेच्या एक टक्का रक्कम लाच मागितली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, बिलोली तालुक्यातील जिगळा येथील दलित वस्तीमधील सीसी ररस्ता दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. त्यानंतर या कामाचा धनादेश देण्यासाठी जिल्हा परिषदेतील लेखाधिकारी मधुकर बालाजी मोरे याने एकूण रकमेच्या एक टक्का रक्कम लाच मागितली होती. ही रक्कम जिल्हा परिषद येथील सेवक आनंद जानापुरी यांच्यामार्फत स्वीकारण्यात येणार होती. या अनुषंगाने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीनुसार प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
त्यानंतर सहाय्यक लेखाधिकारी मोरे यांनी सेवकामार्फत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जिल्हा परिषदेत आज रचलेल्या सापळ्यात 3 हजार 300 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना सेवक जानापुरे याला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणात सहाय्यक लेखाधिकारी मधुकर बालाजी मोरे आणि सेवक आनंत काशिनाथ जानापुरे याच्याविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.