महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Santosh Pandagale : सीमावर्ती भागातील मागणी संदर्भात अशोक चव्हाण घेणार मुख्यमंत्र्यांची भेट - नागरिकांची तेलंगणा राज्यात जाण्याची मागणी

सीमावर्ती भागातील मागणी संदर्भात संतोष पांडागळे यांनी भाष्य केले आहे. अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार ( Ashok Chavan will Meet CM Regarding Border Issues ) आहेत. तेलंगणा राज्यात समाविष्ट करण्याची नांदेडच्या सीमावर्ती भागातील नागरिकांनी मागणी आहे.

Santosh Pandagale
संतोष पांडागळे

By

Published : Dec 5, 2022, 10:20 PM IST

नांदेड :नांदेडच्यासीमावर्ती भागातील नागरिकांच्या मागण्यांसंदर्भात आमचे नेते अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार ( Ashok Chavan will Meet CM Regarding Border Issues ) आहेत. अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी दिली. विकासापासून दूर असल्यामुळे आम्हाला तेलंगणा राज्यात समाविष्ट करा अशी मागणी नांदेडच्या सीमावर्ती भागातील नागरिकांनी केली ( Nanded Citizens Want To go In Telangana ) आहे, मात्र अशी मागणी करण दुर्देवी असल्याचे मत काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केले आहे.

संतोष पांडागळे

सीमा प्रश्नाचा वाद :सध्या सीमा प्रश्नाचा वाद हा गेल्या आठवड्यापासून खूप जोरदार सुरू आहे. बेळगाव वादानंतर कर्नाटकने जत, सांगली, सोलापूरवर सुद्धा हक्क सांगितला त्यानंतर हा वाद आता तेलंगणापर्यंत येऊन पोहचला आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर धर्माबाद आणि बिलोली नागरिकांनी आम्हाला तेलंगणा सरकार सारख्या सुविधा द्या अन्यथा आम्ही सुद्धा तेलंगणात जातो असा इशारा देखील दिला ( Congress Spokesperson Santosh Pandagale ) होता.

दोन हजार कोटींचा नीधी जाहीर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी सीमा भागातील प्रश्न सोडवण्यासाठी दोन हजार कोटींचा निधी जाहीर केला आहे. जतच्या सीमावर्ती भागातील ४० गावावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Karnataka CM Basavaraj Bommai ) यांनी दावा केला होता. त्यावर राज्यातील दोन मंत्री सीमाभागात भेट देणार आहेत. मात्र, कर्नाटक सरकारकडून सीमा भागात ( Maharashtra Karnataka Border Dispute ) मनाई आदेश लागू करण्याचे संकेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहे. शिंदे फडणवीस सरकारवर ( Shinde on Fadnavis Govt ) प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. जत तालुक्यातील दुष्काळी ( Drought in Jat Taluk ) गावांसाठी २ हजार कोटींचा निधी ( Shinde announces Rs 2 thousand crore ) जाहीर केला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details