महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'3 पक्षांच्या सरकारात 'हे' चालतच राहणार' - ashok chavan welcomes in nanded latest news

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांचे शुक्रवारी येथे आगमन झाले. तब्बल ९ वर्षांनंतर चव्हाण हे मंत्रिमंडळात आले आहेत. यावेळी त्यांचे शेकडो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक होते. तसेच विमानतळ ते शासकीय विश्रामगृह या दरम्यान रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी चव्हाण यांचे हारतुरे फटाके बंद वाजवून स्वागत करण्यात आले. यावेळी चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ashok chavhan, cabinet minister
अशोक चव्हाण, कॅबिनेट मंत्री

By

Published : Jan 4, 2020, 2:24 AM IST

नांदेड - हे सरकार ३ पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे काही बाबी होत राहणार. मात्र, माझा आणि अजित पवार यांचा विषय आता संपला आहे, अशी पतिक्रिया राज्याचे कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चव्हाण यादोघांमध्ये खातेवाटपावरून खडाजंगी झाल्याची चर्चा होती. यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

अशोक चव्हाण, कॅबिनेट मंत्री

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांचे शुक्रवारी येथे आगमन झाले. तब्बल ९ वर्षांनंतर चव्हाण हे मंत्रिमंडळात आले आहेत. यावेळी त्यांचे शेकडो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक होते. तसेच विमानतळ ते शासकीय विश्रामगृह या दरम्यान रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी चव्हाण यांचे हारतुरे फटाके बंद वाजवून स्वागत करण्यात आले. यावेळी चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा -सीएएवर चर्चा करण्यासाठी यावं; पाहिजे तर इटालियन भाषेत अनुवाद करतो, शाहांचे राहुल गांधींना आव्हान

राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी राज्याचा कारभार हाकला आहे. त्याच सभागृहात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणे याबद्दल बोलताना ते म्हणाले, यापूर्वीही अनेक माजी मुख्यमंत्र्यांनी नंतरच्या काळात मंत्री म्हणून काम केल्याचा दाखल दिला. मी त्याचा विचार करून मंत्रिमंडळात सहभागी झालो आहे. कारण यामुळे मला मराठवाड्याचा विकास साधता येईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा -केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांचे ठाकरेंसह 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

तर भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी भाजपचे खाजदार प्रताप पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे दोन्ही आरोप एकाच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी केले आहे. यात मी नक्की चौकशी करेल, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी यावेळी दिली. विशेष म्हणजे प्रताप पाटील हे अशोक चव्हाण यांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. शिवाय चिखलीकर यांनीच लोकसभेत अशोक चव्हाण यांना पराभूत केलेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details