महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मागेल त्याला काम', मनरेगामार्फत मजूरांची परिस्थिती सुरळीत करणार

उद्योगधंदे आणि व्यापाराला चालना देण्यासाठी इन्कम टॅक्समध्ये सवलत देण्याची मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. मजूरांना कामाचे योग्य आर्थिक मूल्य मिळण्यासाठी मनरेगा अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय.

ashok chavan news
'मागेल त्याला काम', मनरेगामार्फत मजूरांची परिस्थिती सुरळीत करणार

By

Published : Apr 21, 2020, 12:51 PM IST

नांदेड - उद्योगधंदे आणि व्यापाराला चालना देण्यासाठी इन्कम टॅक्समध्ये सवलत देण्याची मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. त्यातच दैनंदिन कमाईवर पोट भरणाऱ्या मजूरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीय. त्यांना कामाचे योग्य आर्थिक मूल्य मिळण्यासाठी मनरेगा अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू करणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. कोरोनाला रोखण्यासाठी विविध ८८ प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या सीमा बंद ठेवल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आल्याचे चव्हाण म्हणाले. यापुढे देखील जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी नागरिकांना आणखी काळजी घेणे गरजेचे आहे. एका बाजुस कोरोनाशी लढा देत असताना दुसरीकडे विस्कटलेली आर्थिक घडी नीट बसवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, असे ते म्हणाले. यासाठी मनरेगाअंतर्गत 'मागेल त्याला काम' ही योजना सुरू करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे उद्योग आणि व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. यावर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेल्या उपाययोजना पुरेशा नसल्याचे मत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. खासगी कर्मचारी व कामगारांना पगार देण्यासाठी व्यवस्थापनाकडे पैसे नाहीत. त्यांचे बँकेचे हप्ते थकले आहेत. अशावेळी आयकरामध्ये सवलत देणे गरजेचे आहे. त्यासोबतच थकीत हप्त्यांवरील व्याज माफ करण्याचा पुनरोच्चार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details