नांदेड- मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजासाठी ठोस कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे. रविवारी (दि. 11 ऑक्टोबर) लोहा येथे एल्गार मेळाव्यात बोलताना विनोद पाटील यांनी ही मागणी केली.
अशोक चव्हाण यांनी मराठा समाजासाठी ठोस कार्यक्रम जाहीर करावा - विनोद पाटील - विनोद पाटील बातमी
अशोक चव्हाण यांनी मराठा समाजासाठी ठोस कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी लोहा येथील एल्गार मेळाव्यात केली.
यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजातील तरुणांची मते जाणून घेतली. यावेळी सर्व मराठा संघटना आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी मराठा आरक्षणासंदर्भात मते मांडली. सरकारने विद्यार्थ्यांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. सरकारने आपली भूमिका ठोसपणे मांडावी. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील मराठा समाजासाठी ठोस कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी देखील विनोद पाटील यांनी केली आहे. तसेच पुढील काळात विद्यार्थी आणि युवकांच्या कल्याणासाठी जी भूमिका घ्यावी लागेल, ती आम्ही घेऊ, अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी दिली.
हेही वाचा -दोन मुलींसह महिला धबधब्यात गेली वाहून, मुलींना वाचवण्यात यश