नांदेडमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे ( BJP leader Pankaja Munde ) यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा असतानाच, काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण ( Former Minister Ashok Chavan ) यांनी पंकजा यांच्या वक्तव्याला अनुसरून वक्तव्य केले आहे. तुम्ही आमचे ऐका किंवा ऐकू नका, किमान पंकजा मुंडे यांचे तरी नीट ऐकावे अशी अपेक्षा आहे असे अशोक चव्हाण भाजपला उद्देशून म्हणाले. ( Ashok Chavan Criticize on CM Eknath Shinde )
नाराज पंकजा मुंडेंचे वक्तव्य: नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसी चेहरा असलेल्या आणि मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात महिला व बालकल्याण मंत्री असलेल्यापंकजा मुंडेयांना एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. याबद्दल विचारले असता त्यांनी थेट नाराजी व्यक्त न करता त्यांनी टोला लगावला. कदाचित माझी पात्रता नसल्याने मंत्रिपद दिले नसेल असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकवाक्यता नाही अशोक चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील नवीन शिंदे सरकार स्थिर नसून, निर्णय प्रक्रियांनाही विलंब केला जात आहे. मागच्या महाविकास आघाडी सरकारमधील निर्णयांना स्थगिती दिली जाते आहे. तर नवीन निर्णय घेतले जात नाहीत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी 40 दिवस लागल्यानंतर, पालकमंत्र्यांची अजून नियुक्ती नाही. शिवाय खातेवाटपाचा पत्ता नाही. त्यामुळे सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे हे चित्र आहे.