नांदेड -राज्यातील राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. एकनाथ शिंदेंसह 50 आमदारांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले ( Mahavikas Aghadi government collapsed ). या सरकारमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप या आमदारांनी केला. मात्र, या घडामोडींपाठोपाठ आणखी एक चर्चा चांगलीच रंगलेली दिसली ( Talks of Ashok Chavan leaving Congress ). ती म्हणजे काँग्रेस नेते अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याची. यावर आता चव्हाणांनी स्वतःच उत्तर दिले आहे.
बहुमत चाचणीदिवशी सभागृहात गैरहजर -अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे विधानसभेतील तब्बल ११ आमदार बहुमत चाचणीदिवशी सभागृहात गैरहजर ( absent from hall on floor test day ) होते. यानंतर या आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. काँग्रेस हायकमांडनेही पक्षशिस्त मोडल्याच्या आरोपाखाली या ११ आमदारांवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे, अशोक चव्हाण पक्ष सोडणार ( Ashok Chavan leaving Congress ) असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या. मात्र अशोक चव्हाणांनी या चर्चा फेटाळून लावल्या ( Ashok Chavan Rejected discussions of leaving congress ) आहेत. मी असा कुठलाही निर्णय घेतला नाही, ( not taken any discussion of leaving congress ) असे उत्तर त्यांनी दिले आहे.