महाराष्ट्र

maharashtra

रणधुमाळी विधानसभेची : अशोक चव्हाणांचा उमेदवारी अर्ज दाखल

By

Published : Sep 30, 2019, 12:24 PM IST

Updated : Sep 30, 2019, 1:25 PM IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भोकरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. अशोक चव्हाण यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

रणधुमाळी विधानसभेची : अशोक चव्हाणांचा उमेदवारी अर्ज दाखल

नांदेड- जिल्ह्यातील भोकर विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. लोकसभेत पराभव झाल्यानंतर अशोक चव्हाण विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. कॉंग्रेसने 51 उमेदवारांची पहिली यादी घोषीत केली आहे. यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भोकरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. अशोक चव्हाण यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

जिल्ह्यातील भोकर मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे. लोकसभेची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपची व्यूहरचना सुरू असून त्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. लोकसभा निवडणुकीत नाराजीचा मोठा फटका बसल्याने ते पूर्णवेळ मतदारसंघात थांबून आहेत. मतदार आणि कार्यकर्त्यांशी चव्हाण व्यक्तीशः संपर्कात आहेत. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Last Updated : Sep 30, 2019, 1:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details