नांदेड -राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन वेगवेगळ्या पक्षांचे सरकार अस्तित्वात आले. त्यामुळे काही लोकांना तीन वगेळ्या पक्षांच्या नेत्यांचे फोटो एकाच बॅनरवर पाहून आश्चर्य वाटत असेल. मात्र, भाजपला राज्यातून घालवण्यासाठी हे आवश्यक होते, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
भोकर येथील नागरी सत्कार समारंभात बोलताना अशक चव्हाण... हेही वाचा... 'फडणवीसांचे सर्व अंदाज चुकतात, त्यांनी चांगला भविष्यवाला शोधावा'
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा आज शनिवारी त्यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात नागरी सत्कार करण्यात आला. भोकर शहरातील मोंढा मैदानावर या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थानिकांनी अशोक चव्हाण यांचा सपत्नीक सत्कार केला. चव्हाण यांचा ३५ फुटी हार आणि चांदीची तलवार देऊन सत्कार करण्यात आला.
हेही वाचा... 'सारथी' ला वाचविण्यासाठी खासदार संभाजीराजेंचे लाक्षणिक उपोषण
तीन पक्षांच्या नेत्यांचे फोटो एकत्र पाहुन आश्चर्य वाटत असेल पण...
चव्हाण यांच्या सत्कार समारंभात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे एकाच बॅनरवर फोटो लावण्यात आले होते. याबद्दल आपल्या भाषणात बोलताना त्यांनी यावर उत्तर दिले. तीन वेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे एकाच बॅनरवर लावलेले फोटो पाहून सर्वांना आश्चर्य वाटत असेल. मात्र, राज्यातून भाजपला घालवण्यासाठी हे करणे आवश्यक होते. अगोदर महाराष्ट्रातून आणि नंतर देशातून भाजपला हद्दपार करायचे असेल, तर त्याचा प्रयोग महाराष्ट्रातून करावा लागेल, असे सोनिया गांधी यांना पटवून दिले. त्यानंतरच हे सरकार अस्तित्वात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे सरकार हे पुढील १५ वर्ष सत्तेत राहील
भाजपचे अनेक नेते महाविकासघडीचे सरकार कधी कोसळणार, यावर लक्ष ठेऊन असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. मात्र, महाविकासआघाडीचे हे सरकार मजबूत आहे. तसेच ते पुढील किमान १५ वर्ष टिकेल, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.