महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड पोलीस दलातील आठ अधिकारी कर्मचाऱ्यांचा अशोक चव्हाणांच्या हस्ते सत्कार - Ashok Chavan

नांदेड पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी त्यांना बोधचिन्ह देण्याचे जाहीर केले आहे.

ashok chavan felicitate nanded police  personals for better work
नांदेड पोलीस दलातील आठ अधिकारी कर्मचाऱ्यांचा अशोक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार

By

Published : May 1, 2020, 2:30 PM IST

नांदेड- महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल नांदेडच्या आठ पोलीस अधिकारी-कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलिसांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्याच्या पोलीस महासंचालक यांनी बोधचिन्ह आणि सन्मानचिन्ह जाहीर केले आहे, याबद्दल या सर्वांचा सत्कार चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन केला.

पोलीस निरीक्षक प्रशांत अनंतराव पवार यांनी सतत १५ वर्षे उत्तम सेवा, सहपोलीस उपनिरीक्षक खामराव रामराव वानखेडे, मांडवी गुणवत्तापूर्ण सेवा, पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक शिवदास देशमुख यांनी नांदेड ग्रामीण येथे १५ वर्षे उत्तम कामगिरी, पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव मोहनराव पल्लेवाड, नाहरा येथे उत्तम सेवा 15 वर्ष पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

दहशतवादी विरोधी पथकात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल बालाजी गणपतराव सोनटक्के, शामसुंदर यादवराव छात्रकर, उस्मान नगर यांनी दरोडेखोर गुन्हेगारांच्या टोळीयुद्ध केलेली कार्यवाही, सूर्यकांत व्यंकटराव घुगे,ईतवारा पोलीस स्टेशन येथे १५ वर्षे उत्तम कामगिरी आणि मारुती रामराव केसगिर पोलीस मुख्यालय,नांदेड येथे 15 वर्षे उत्तम कामगिरी केल्याबद्दल सन्मान आणि सत्कार करण्यात आला.

सत्कारप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र मनोज लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्त डॉ.सुनील लहाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके,उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार अरुण जऱ्हाड यांची उपस्थिती होती

ABOUT THE AUTHOR

...view details