नांदेड - राज्याचे शिक्षणमंत्री राहिलेल्या विनोद तावडे यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. तावडे यांनी काँग्रेसमध्ये यावं आपण त्यांना उमेदवारी देऊ अस आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मोहन हंबर्डे यांच्या प्रचारासाठी आयोजीत सभेत चव्हाण बोलत होते.
मला सल्ला देणाऱ्या तावडेंसोबत नियतीने 'विनोद' केला - अशोक चव्हाण - Ashok Chavan news
अशोक चव्हाण यांनी विनोद तावडेंना टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये येण्याचा सल्लाही तावडेंना दिला.
काही दिवसांपुर्वी विनोद तावडे नांदेडला आले होते. अशोक चव्हाण लोकसभेला तोंडावर आपटले आता त्यांनी विधानसभा निवडणुक लढवुन आपली उरली सुरली पत घालवू नये असा सल्ला तावडे यांनी त्यावेळी दिला होता. चव्हाणांना सल्ला देनाऱ्या विनोद तावडे यांनाच भाजपाने उमेदवारी दिली नाही. शिक्षणमंत्री या महत्वाच्या पदावर राहिलेल्या तावडे यांना उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांची राज्यभर सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवल्या गेली होती.
नांदेडमध्ये आयोजीत सभेत अशोक चव्हाण यांनीही तावडे यांना लक्ष्य केले. विनोद तावडेंसोबत नियतीनेच विनोद केला. आता त्यांनी लवकर काँग्रेसमध्ये यावे मी उमेदवारी देतो असा उपरोधिक सल्ला अशोक चव्हाण यांनी दिला. चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.