महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप केवळ आश्वासनाचे सरकार - अशोक चव्हाण

भोकर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ अर्धापूर तालुक्यातील घेण्यात आलेल्या प्रचार सभेत अशोक चव्हाण बोलत होते.

By

Published : Oct 14, 2019, 12:21 PM IST

अशोक चव्हाण

नांदेड- भाजप-शिवसेना महायुतीच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या काळात कोणताही घटक समाधानी नाही. एकीकडे महागाईने जनता होरपळून निघाली आहे. तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न अजूनही रेंगाळत आहे. शेतीमालाला आधारभूत किंमत मिळत नाही. बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मेगाभरती नाही, कारखाने बंद होत आहेत, नोकऱ्या जात आहेत. त्यातूनच बेरोजगारीची संख्या वाढत आहे. भाजप सरकार केवळ आश्वासनाचे सरकार असून हे बनवा-बनवी करणारे सरकार आहे, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

चव्हाण पुढे बोलताना म्हणाले, की देश हातातून गेला आता महाराष्ट्र जावू देवू नका, भाजप-सेनेने केलेल्या आश्वासनाची खैरात पाहून मतदारांनी देश घालवला आहे. सध्या देशात आर्थिक मंदी भेडसावत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आज शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, नोकरदार यासह सर्वसामान्य जनता कोणीही समाधानी नाही, असे चव्हाणांनी सांगितले.

हेही वाचा -जिल्हा परिषदेच्या शाळांना साहित्याचा पुरवठा; वापर मात्र नाहीच

शेतकऱ्यांना बँकेकडून नवीन पीक कर्ज मिळत नाही. पीक कर्ज काढायला गेले तर बँकवाले त्यांना बेबाकी प्रमाणपत्र मागत आहेत. कर्ज माफ झाले नसल्यामुळे बेबाकी प्रमाणपत्र मिळत नाही, असे चव्हाणांनी सांगितले. तसेच नांदेड जिल्ह्याच्या हक्काचे पाणी मी कधीही पळवू देणार नाही, यासाठी माझी लढाई करण्याची तयारी देखील आहे, असे चव्हाण यावेळी म्हणाले.

यावेळी संतोष गव्हाणे, बालाजी गव्हाणे, संजय लहानकर, आनंदराव कपाटे, उध्दवराव राजगोरे, लताबाई मुंगल, जयवंत पवार, रोहिदास जाधव, धोंडीबा कल्याणकर, साहेबराव सोळंके, संजय गोवंदे, बाळू पाटील शेणीकर, पुंडलिक पवार, देवराव पवार, गौरव राठोड यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - आमच्यावर टीका न करता 'त्यांनी' विकासाच्या नावावर मतदान मागावे - खासदार चिखलीकर

ABOUT THE AUTHOR

...view details