नांदेड - काँग्रेसचा गड शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण जिल्ह्यातील सर्व जाती-धर्माची वेगळी बैठक घेत आहेत. त्यांनी सोशल इंजिनियरिंगचा प्रयोग सुरू केला आहे. तर दुसरीकडे भाजपनेही काँग्रेसच्या गडाला पोखरून नवा 'प्रताप' घडवण्यासाठी बूथ पातळीपर्यंत काम सुरू केले आहे.
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षानी 'वेट अँड वॉच' ची भूमिका घेतली आहे. एकमेकांचा उमेदवार पाहून आपला 'पत्ता' समोर कसा करता येईल याची वाट पाहत आहेत. तर काँग्रेसकडून अशोकराव चव्हाण की अमिता चव्हाण हे अद्याप स्पष्ट नाही. भाजपकडून प्रतापराव पाटील चिखलीकर की अन्य कुणी याबाबत सध्या तरी गुप्तताच आहे. पण जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळचे कट्टर मित्र आज कट्टर विरोधक अशोक चव्हाण विरुद्ध प्रतापराव असाच सामना होईल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. २ दिवस सुट्टीचे असल्यामुळे शेवटच्या टप्प्यातच सोमवारी किंवा मंगळवारी हे चित्र स्पष्ट होणार आहे.
नांदेड मतदारसंघाचे डॉ . शंकरराव चव्हाण, व्यंकटराव देशमुख तरोडेकर, भाई केशवराव धोंडगे, सूर्यकांता पाटील, अशोक चहाण अशा दिग्गजांनी नेतृत्व केले आहे . त्याचबरोबर भास्करराव पाटील-खतगावकर यांनी ३ वेळा, तर शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, देवराव कांबळे, व्यंकटराव देशमुख तरोडेकर या चौघांना दोनदा खासदार होण्याची संधी मिळाली आहे.
जिल्ह्यात १९५२ पासून ३ वेळा वगळता १४ वेळा काँग्रेसचाच खासदार निवडून आला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप असा राजकीय सामना अवलंबून असला तरी वंचित बहुजन आघाडीनेही नांदेडमधूनच आपले रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे यावेळी वंचित बहुजन आघाडी त्याच तुलनेने लढत देऊ शकते.
समाविष्ट विधानसभा मतदारसंघ