महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्राचे ठिगळ लावलेले पॅकेज निरुपयोगी - अशोक चव्हाण - केंद्रीच्या २० लाख कोटींच्या पॅकेजवर अशोक चव्हाणांची टीका

पंतप्रधानांनी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा केल्याने नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र, पहिल्या दोन दिवसांमध्ये जाहीर झालेल्या पॅकेजमध्ये प्रत्यक्ष मदतीपेक्षा घोषणा अन् आकड्यांचाच मारा अधिक दिसून येतो. कृषी कर्जाचे वितरण, शेतमाल खरेदीसाठी निधी, सहकारी व ग्रामीण बॅंकांसाठी नाबार्डचा निधी याबाबी दरवर्षीच्याच आहेत, असे अशोक चव्हाण म्हणाले.

central government financial package 2020  20 lekh crore financial package  ashok chavan criticized central government  ashok chavan on financial package  केंद्रीच्या २० लाख कोटींच्या पॅकेजवर अशोक चव्हाणांची टीका  २० लाख कोटी पॅकेज केंद्र सरकार
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

By

Published : May 15, 2020, 12:18 PM IST

नांदेड - केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून जाहीर होत असलेले पॅकेज म्हणजे काही जुन्या घोषणा, काही अनियमित उपाययोजना आणि भविष्यासाठी काही आश्वासनांची पुरचुंडी आहे. देशाची उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था लवकर रूळावर आणण्यासाठी असे ठिगळांचे पॅकेज फारसे उपयोगी ठरणार नाही. त्याऐवजी केंद्र सरकारने थेट भरीव आर्थिक अनुदानाच्या घोषणा कराव्यात, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

पंतप्रधानांनी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा केल्याने नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र, पहिल्या दोन दिवसांमध्ये जाहीर झालेल्या पॅकेजमध्ये प्रत्यक्ष मदतीपेक्षा घोषणा अन् आकड्यांचाच मारा अधिक दिसून येतो. कृषी कर्जाचे वितरण, शेतमाल खरेदीसाठी निधी, सहकारी व ग्रामीण बॅंकांसाठी नाबार्डचा निधी याबाबी दरवर्षीच्याच आहेत. मनरेगाची मजुरी वाढवण्याचा निर्णयही अगोदरच झाला आहे, अशा घोषणा पॅकेजशी जोडून केंद्र सरकार देशाची दिशाभूल करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बुधवारी सुक्ष्म, लघू, मध्यम तसेच कुटीर व गृहद्योगांबाबत अनेक घोषणा केल्या. मात्र, उत्पादन आणि निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देताना बाजारात मागणी देखील वाढवावी लागणार आहे. मागणी वाढवायची असेल, तर ग्राहकांची क्रयशक्ती वाढवावी लागणार आहे. त्यासाठी गरीब व सर्वसाधारण आर्थिक परिस्थितीमधील नागरिकांच्या हातात थेट पैसा द्यावा लागेल. त्यामुळे या पॅकेजमध्ये केंद्र सरकारने मजूर, कामगार, शेतकरी अशा घटकांना किमान ७ हजार ५०० रुपयांची मदत देण्याची घोषणा केली पाहिजे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details