नांदेड - शरद पवार यांच्यावरची ईडीची कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. ही कारवाई घृणास्पद असून लोकशाहीला मारक असल्याचे ते म्हणाले. चव्हाण यांनी यावर पहिल्यांदाच भाष्य केले असून, सरकारवर जोरदार टीका केली.
राजकीय सूडबुद्धीनेचं शरद पवार यांच्यावर ईडीची कारवाई - अशोक चव्हाण
शरद पवार यांच्यावरची ईडीची कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. ही कारवाई घृणास्पद असून लोकशाहीला मारक असल्याचे ते म्हणाले. चव्हाण यांनी यावर पहिल्यांदाच भाष्य केले असून, सरकारवर जोरदार टीका केली.
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजप अन्य मार्गांचा वापर करत आहे. शरद पवारांची ईडी चौकशी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. राजकीय सूडबुद्धीच्या मानसिकतेचा काँग्रेसने नेहमीच निषेध केला आहे. चव्हाण नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
भाजपचा नेहमीच विरोधकांनी संपलण्याचा प्रयत्न
भाजपने नेहमीच आपले राजकीय विरोधक संपवण्याचा प्रयत्न केला आहे. हे लोकशाहीला मारक असल्याचे चव्हाण म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय सुडबुद्धीने ही कारवाई केल्याचे चव्हाण म्हणाले. सध्या लोकशीहाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.