नांदेड- मनपाने शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली आहे. शहराला विष्णुपुरी बंधाऱ्यातून पाणी पुरवठा केला जातो. सध्या हा बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. मात्र तरी देखील मनपाकडून शहराला चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.
शहराला पाणी पुरवठा करणारा विष्णुपुरीचा बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. आतापर्यंत पाच वेळा बंधाऱ्याचे दरवाजे उघडून त्यातील पाणी नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वाया जात आहे. बंधाऱ्यातील पाणी शहराला पुरवून लोकांची तहान भागविण्याऐवजी शहर मनपाकडून पाणी प्रश्न प्रलंबित ठेवला जात आहे. आता तर आचारसंहिता लागल्याने मनपाने निर्माण केलेली ही कृत्रिम पाणीटंचाई दिवाळीपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.