नांदेड- शहरासह जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना थोडा दिलासा देणारी बातमी आहे. बाजारपेठातील काही दुकाने सोमवार 18 मे पासून खुली राहणार आहेत. असा आदेश नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढण्यात आला आहे.
नांदेडात सोमवारपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने राहणार सुरू
पाच दिवसांचा आठवडा करत सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ऑटोमोबाईल्स कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक्स, टायर्स, बॅटरी, मोबाईल शॉप, घड्याळ दुकाने, बुक स्टोअर्स व स्टेशनरी, मोबाईल शॉप, सायकल स्टोअर्स सुरू करता येतील.
कोरोना महामारीच्या संकटापासून बचावासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे व्यापार ठप्प असून याचा मोठा आर्थिक फटका सर्वांनाच बसत आहे. जिल्ह्यात लॉकडाउनच्या नियमात थोडी शिथिलता देत, काही अटींवर काही दुकाने उघडी करण्यास मुभा देण्यात आली आहे. यामध्ये पाच दिवसांचा आठवडा करत सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ऑटोमोबाईल्स कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक्स, टायर्स, बॅटरी, मोबाईल शॉप, घड्याळ दुकाने, बुक स्टोअर्स व स्टेशनरी, मोबाईल शॉप, सायकल स्टोअर्स सुरू करता येतील. दुकाने उघडताना मास्क, सॅनिटाईझरचा वापर करणे अनिवार्य असेल.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास पाच हजाराचा दंड महापालिका किंवा नगरपालिका अंतर्गत आकारण्यात येईल, असा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढण्यात आला आहे.