नांदेड -नांदेडमध्ये निर्बंध लावूनही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता विनाकारण फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पालिका आयुक्त रस्त्यावर उतरले आहेत. कारण नसताना बाहेर फिरणाऱ्यांना पकडून त्यांची जागेवरच अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. शहरातील राज कॉर्नर आणि वजीराबाद चौकात या अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहेत. आज या परिसरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी वाहने आडवून रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या अँटीजेन टेस्ट करायला लावल्या.
पॉझिटिव्ह आढळल्यास विलगीकरण कक्षात रवानगी