कारवाई न करण्यासाठी 5 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात
ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार कारवाई न करण्यसाठी दहा हजाराची लाच मागून पाच हजार स्विकारल्याप्रकरणी कंधार ठाण्याअंतर्गत असलेल्या कुरुळा दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष चोपडे यांच्यासह एका खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकला.
नांदेड : जिल्ह्यातील कंधार ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार कारवाई न करण्यसाठी दहा हजाराची लाच मागून पाच हजार स्विकारल्याप्रकरणी कंधार ठाण्याअंतर्गत असलेल्या कुरुळा दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष चोपडे यांच्यासह एका खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकला. या दोघांविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहा हजाराची मागितली होती लाच
याबाबत अधिक वृत्त असे की, कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तक्रारदाराने आपल्या विरोधात आलेल्या तक्रार अर्जाची माहिती घेण्यासाठी दुरक्षेत्र पोलीस चौकी कुरुळा येथे गेला. तेथील चौकीचे प्रमुख तथा पोलीस उपनिरीक्षक सुभाष म्हैसाजी चोपडे (वय ५६ रा. सिडको, नांदेड) याने कारवाई न करण्यासाठी दहा हजाराची लाच मागितली. तडजोअंती पाच हजार रुपये लाच देण्याचे ठरले. परंतु लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने नांदेड येथे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार दिली.
सापळा रचून केली कार्यवाही
या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नऊ जून रोजी कुरुळा दुरक्षेत्र चौकी परिसरात सापळा लावला. यावेळी सरकारी पंचासमक्ष चोपडे याचा खासगी व्यक्ती शेख फारुख शेक युसुफ (रा. कुरुळा, ता. कंधार) याच्यामार्फत पाच हजार रुपये घेताना रंगेहात जाळ्यात अडकले. सुभाष चोपडे व शेख फारुख यांच्याविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात लाचप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वीच इस्लापूरचा पोलिसावर गुन्हा दाखल झाला होता.