नांदेड -शहरातील व्हीआयपी रस्त्यावर रविवारी एका महिलेला मोकाट जनावराने धडक देऊन जखमी केल्याची घटना घडली. शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न सोडविण्यास महापालिका उदासीनता दाखवत असून याचा त्रास शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
नांदेडमध्ये मोकाट जनावरांचा दुसऱ्यांदा हल्ला हेही वाचा -नांदेड: रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी
रविवारी शहरातील व्हीआयपी रस्त्यावर मोकाट जनावराने एका महिलेला धडक देऊन जखमी केल्याची घटना घडली. त्यामुळे हा प्रश्न महापालिका गांभीर्याने घेणार का? अशी चर्चा जोर धरत आहे. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडून बसलेली असतात. कधी कधी ही जनावरे पादचाऱ्यांवरही हल्ला करतात.
हेही वाचा -नांदेड शहरातील मोकाट सांडांचा बंदोबस्त करण्याची मागणी
महिनाभरापूर्वी एका वळूने असाच हल्ला वजिराबाद भागात एका महिलेवर केला होता. त्या हल्ल्यात सुदैवाने ती महिला थोडक्यात बचावली. रविवारी शहरातील व्हीआयपी रस्त्यावर असाच हल्ला महादेव दालमिल परिसरात झाला. ही महिला जात असताना एका वळूने महिलेला धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली असून उपस्थितांनी या महिलेला रुग्णालयात भरती केले आहे. महानगरपालिका मोकाट जनावरांचा विषय गंभीरतेने का घेत नाही? असा प्रश्न नागरिक करत आहेत.